महाराष्ट्रात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असून अद्याप काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. पुण्यात रविवार आणि सोमवार असे दोन दिवस मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे उजनी धरणात ३५ हजार क्युसेक वेगाने पाणी येऊ लागले आहे. उजनी धरण १०८ टक्के भरले असून धरणात १२३ टीएमसी एवढा पाणीसाठा आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळी ११ वाजल्यापासून पुन्हा ५० हजार क्युसेक वेगाने उजनीतून भीमा नदीत पाणी सोडले आहे.
राज्यात पावसामुळे खरीपाच्या कापणीला आलेल्या पिकांना मोठा फटका बसलाच, तर शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला, तसेच या पावसाचा परिणाम रब्बीच्या पिकांवरही झाला आहे. त्यामुळे आताच्या महाराष्ट्र सरकारने मागे जाहीर केलं होतं की, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित केले जाणार, मात्र अजूनही ते झालेले नाही. पावसामुळे सोलापूर शहरातील रस्त्यांची कामे देखील रखडली आहेत.