बिग बॉस ओटिटि आता शेवटच्या टप्प्यात आहे. 16 सप्टेंबर रोजी बिग बॉस ची अंतिम फेरी होणार आहे. रविवारी मुस्कान ला शोमधून बाहेर पडावे लागले . आता बिग बॉसच्य घरात सहा जण शिल्लक राहिले आहेत.
शमिता शेट्टी, राकेश बापट, निशांत , दिव्या अग्रवाल, प्रतीक , सहज पाल आणि नेहा भसीन यांच्यामध्ये आता अंतिम लढत होणार आहे. मुस जटाना ही घराबाहेर पडल्यानंतर प्रतीक सूरजपाल तिला निरोप देताना जोर-जोरात रडताना दिसला . आता सर्व सहाजण अंतिम फेरीसाठी लढताना दिसतील . बिग बॉस मध्ये कोण बाजी मारणार हा औत्सुक्याचा विषय आहे. गायिका नेहा कक्कड आणि टोनी कक्कड यांनी घर वाल्यांचे रविवारी मनोरंजन केले . या शोचे आयोजक करण जोहर यांनी विजेत्या ट्रॉफी ची झलक दाखवली.