सोलापूर : शहरांमध्ये स्मार्ट सिटी योजनेतून सुरू असलेली कामे दिरंगाईने पूर्ण होत असल्यामुळे वाहतूकदारांना आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सोलापूर शहरातील या चार सॅम्पल व्हिडिओ मुळे तुम्हाला शहरात कशा पद्धतीने काम सुरू आहेत याचं समग्र दर्शन होईल. जुना पुना नाका येथील छत्रपती संभाजीराजे पुतळ्याजवळ बऱ्याच दिवसापासून खोदलेल्या रस्त्यामध्ये गुरुवारी सकाळी एक ट्रक फसला त्याला क्रेनच्या साह्याने काढण्याचे काम सुरू होते. कन्ना चौकाजवळील पद्मा टॉकीजच्या समोर जलवाहिनीवर भलेमोठे ड्रेनेज चेंबर बांधले जात आहे. यामुळे स्मार्ट सिटीचा स्मार्ट कन्सल्टंट ने कसा सल्ला दिला हे शहर वासियांच्या समोर आले आहे. लक्ष्मी मार्केट जवळ नुकताच सिमेंटचा रस्ता तयार करण्यात आला या कामाला दहा दिवस पूर्ण होत नाही तोपर्यंत काल हा सुमारे 15 ते 20 फूट रस्ता फोडून ड्रेनेजच्या पाण्याला वाट करून देण्यात आली. नवी पेठची हाल तर बघायला नको लॉकडाऊन असताना काम केले नाही आता बाजारपेठा खुल्या झाले असून नवी पेठ खोदून ठेवली आहे. त्यामुळे इथे दररोज ड्रेनेजच्या पाण्याचे पाणी वाहतात. जलवाहिनी फुटून शुद्ध पाणी वाया जाण्याचे प्रकार तर दररोजच घडत आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटी ज्या ठिकाणी काम करत आहे ती गरज आहे का आणि त्या कामाचा दर्जा याबाबत शंका उपस्थित झाली आहे.
