MCA अपेक्स कौन्सिल सदस्य सुशील शेवाळे यांच्या हस्ते शुभारंभ…
सोलापूर – येथील जिल्हा क्रिकेट संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील नोंदणीकृत क्रिकेट क्लब मधील तसेच लेदर बॉल क्रिकेट खेळणारे खेळाडू यांच्यासाठी कायमचे ओळखपत्र म्हणून स्मार्ट कार्ड तयार करण्यात आले असून त्याचे वितरण करण्यात येणार असून त्याचा शुभारंभ आज जिल्हा क्रिकेट संघटनेच्या कार्यालयात एमसीए चे अपेक्स कौन्सिल सदस्य सुशील शेवाळे (MCA इन्फ्रास्ट्रक्चर समिती चेअरमन) यांच्या हस्ते व जिल्हा क्रिकेट संघटनेचे संयुक्त सचिव चंद्रकांत रेम्बर्सु यांच्या उपस्थितीत विरांश वर्मा (NG क्रिकेट अकादमी) या खेळाडूला देऊन करण्यात आला. यावेळी जिल्हा संघटनेचे व MCA गुणलेखक व सांख्यिकी मिलिंद गोरे हे देखील उपस्थित होते.
जिल्हा क्रिकेट संघटना आता डिजिटल होत असून त्याचेच अंतर्गत शहर आणि जिल्ह्यातील सर्व क्लब, अकॅडमी, क्रिकेट संस्था ह्या सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेशी संलग्न करण्यात येत असून त्यातील व इतर सर्व खेळाडू यांची नोंदणी करण्यात येत असून त्यासाठी त्यांना स्मार्ट डिजिटल कार्ड देण्यात येणार असून त्यावर त्यांची संपूर्ण माहिती असणार असून जिल्ह्यातील कोणत्याही स्पर्धेत खेळताना जिल्हा क्रिकेट संघटनेचे परवानगीने अधिकृत स्पर्धेत खेळताना सदरचे कार्ड बाळगणे हे अनिवार्य असणार असून त्यावरील माहिती संघटनेच्या कार्यालयात संगणकात जमा करण्यात आली आहे. प्रत्येक वयोगटाच्या खेळाडूंना वैयक्तिक कार्ड देण्यात येणार असून प्रत्येकाचा नोंदणी क्रमांक वेगळा असणार आहे.

जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील तसेच अध्यक्ष माजी आमदार दिलीप माने, व्हाइस चेअरमन श्रीकांत मोरे, संयुक्त सचिव खासदार धैर्यशील मोहिते पाटील व चंद्रकांत रेम्बर्सु यांच्या संकल्पनेतून या योजनेस संघटनेच्या बैठकीत मंजुरी मिळाली होती.
या संकल्पने मागे जिल्हा क्रिकेट संघटनेचा संपूर्ण आर्थिक व्यवहार हा पेपरलेस करण्याचे ठरले असून त्याकरिता संघटने कडून लवकरच क्युआर कोड देण्यात येणार असून त्याद्वारे संलग्न क्लब, खेळाडू हे नोंदणी फी, निवड चाचणी फी संघटनेच्या खात्यात जमा करू शकतात.
यासंदर्भात अधिक माहितीसाठी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्यालयीन कर्मचारी अभिजित बंडगर (मो.7822015922) यांच्याशी सकाळी 10 ते दुपारी 4 यावेळेत संपर्क करता येणार असल्याचे संयुक्त सचिव चंद्रकांत रेम्बर्सु यांनी कळविले.