माढा : विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाला सर्वांग,परिपुर्ण, योग्य आकार द्यायाचा असल्यास, त्याचा शैक्षणिक विकास साधताना जीवन शल्यांचा, नितीमुल्यांचाही पाठ देणं गरजेचं आहे. तेव्हाच तो विद्यार्थी समाजातील एक उत्कृष्ट घटक बनेल, असे विधान डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण यांनी, छत्रपती शिवाजी महाराज समाजसेवा प्रतिष्ठान, बुद्रुकवाढी आयोजित १०वी,१२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी केले.
यावेळी विद्यार्थी, ग्रामस्थ , पदाधिकारी, विविध गावचे बहुसंख्य शिक्षक ,पालक उपस्थित होते. त्यांना प्रबोधित करताना संस्थेच्या प्रथम कार्यक्रमाच्या उद्घाटक, प्रमुख अतिथी प्रो.डॉ.सुवर्णा गुंड – चव्हाण पुढे म्हणाल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपुढं खूप आव्हानं आहेत त्यावर मात करण्यासाठी पालक,शिक्षक आणि ग्रामस्थ सुसंस्कारित करतात, प्रेरणा देतात त्याचा विद्यार्थ्यांनी उपयोग करून यश संपादन केले पाहिजे.हे कार्य आपल्या गावात छत्रपती शिवाजी महाराज समाजसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रामचंद्र जाधव करत आहेत ही कौतुकाची व अनुकरणीय बाब आहे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते भिमराव गुंड यांनीही मार्गदर्शन केले.याप्रसंगी गुणवंत, यशस्वी विद्यार्थ्यांना, रोख रक्कम, प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.तसेच गावातील उच्च पदावर निवड झालेल्या दिनेश रणपिसे, जगदिप दळवी यांचा विशेष सत्कार केला.व निवडक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली.
याप्रसंगी याप्रसंगी, राम केसरे ,शशीकांत लोकरे, रसिका केसरे, कलावती कवडे, राधिका जाधव, रंजना दळवी, सिंधूबाई जाधव, शंकर जाधव, धनाजी गुंड, निवास कवडे, लक्ष्मण गुंड, विष्णू दळवी, रमेश माने, सुरेश चव्हाण, शंकर शिंदे, बाबासाहेब पवार, बाबासाहेब रणपिसे, आप्पासाहेब बुद्रूक, सुधीर नवले अनिल रमकेसह मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. डॉ रामचंद्र जाधव यांनी प्रास्ताविक केले. महेश नागटिळक यांनी सुत्रसंचालन केलं व आभार दळवी यांनी मानले.