सोलापूर : महाराष्ट्र राज्य परिवहन कर्मचाऱ्यांनी एसटीचा विलिनीकरणासाठी राज्यभरात बेमुदत संप पुकारले असून या न्याय हक्काच्या आंदोलनाला सिटूने सक्रीय पाठिंबा दिला आहे. माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर व सिटू चे राज्य महासचिव ऍड.एम.एच.शेख यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे याबाबत आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त होता आडम मास्तर यांच्यासह काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.