सिक्कीम : देशाच्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. या मुसळधार पावसाचा फटका सिक्कीमला बसला आहे. सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात 550 पर्यटक अडकले आहेत. पर्यटक अडकल्याची माहिती मिळताच घटनास्थळी स्ट्रायकिंग लायन डिव्हिजनच्या तुकड्यांकडून त्यांना मदत केली जात आहे.
सिक्कीममध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसामुळे राजधानी गंगटोक आणि त्याच्या लगतच्या भागातील पाणीपुरवठ्यावर खंडीत झाला आहे. तसेच उत्तर सिक्कीम जिल्ह्यातील विविध ठिकाणी रस्ता खराब झाल्याने पर्यटक अडकले आहेत. त्यामुळे जवळपास 550 पर्यटक अडकले.