No Result
View All Result
सोलापूर : सोलापूरकरांना आता सिद्धरामेश्वराच्या यात्रेचे वेध लागले आहेत .त्यामुळे यात्रेच्या प्रमुख कोण कोणत्या दिवशी हे धार्मिक विधी होतील याची माहिती सिद्धेश्वर यात्रेतील प्रमुख पुजारी राजशेखर हिरेहब्बू यांनी दिली. 11 ते 17 जानेवारी दरम्यान हे प्रमुख धार्मिक विधी पार पडणार आहेत.
11 जानेवारी रोजी सिद्धरामेश्वराच्या हातातील योगदंड हिरेहब्बू यांच्या वाड्यातून शुक्रवार पेठ पेठेतील शेटे यांच्या वाड्यात आणला जाणार आहे. शेटे वाड्यात ऍड. मिलिंद थोबडे कुटुंबियांच्या वतीने योगदंडाची पूजा करण्यात येणार आहे. 12 जानेवारी रोजी रात्री पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजास साज चढवण्यात येणार आहे. 13 जानेवारी रोजी 68 लिंगाना तैलाभिषेक करण्यात येणार आहे. रविवार दि. 14 जानेवारी रोजी अक्षता सोहळा होणार आहे तर 15 जानेवारी रोजी सातही नंदीध्वजास सिद्धेवश्वर तलावात करमुटगी लावण्याचा कार्यक्रम होईल. त्यादिवशी रात्री होम मैदानावर होम विधीचा सोहळा पार पडणार आहे. 16 जानेवारी रोजी होम मैदानावर शोभेचे दारूकाम होईल आणि 17 जानेवारी रोजी देशमुख वाड्यात वस्त्र विसर्जन सोहळ्याने यात्रेतील धार्मिक विधींची सांगता होईल.
No Result
View All Result