जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांचा निर्धार
सोलापूर : सोलापूरची सिद्धेश्वर यात्रा शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसारच होईल अवघ्या 50 मानकरी आणि प्रमुखांच्या उपस्थितीत यात्रेतील सर्व धार्मिक विधी 12 ते 16 जानेवारीदरम्यान पार पडतील यादरम्यान सिद्धेश्वर मंदिर भाविकांसाठी बंद राहील तसेच या परिसरात जमावबंदी राहील अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर तसेच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे महापालिका आयुक्त पी शिवशंकर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते या प्रमुखांनी जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी सकाळी बैठक घेऊन या यात्रेतील माहिती पत्रकारांना दिली.