सोलापूर : सिद्धेश्वर सहकारी कारखान्यात एका कामगाराचा पंचवीस फुटावरून पडल्यामुळे मृत्यू ओढवला आहे. सिद्धाराम रेवणसिद्ध कोणते राहणार यतनाळ, दक्षिण सोलापूर असे मृताचे नाव आहे. कोजन विभागात काम चालू असताना सिद्धाराम हा 25 ते 30 फूट उंचीवरून तोल जाऊन खाली पडला होता त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची सिव्हिल चौकीत नोंद आहे. एमआयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहेत.