येस न्युज नेटवर्क : टीम इंडियाचा स्टार फंलदाज शुभमन गिललाही मॅच फीच्या 15 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. दुसऱ्या डावात कॅमेरून ग्रीनकडून गिल झेलबाद झाल्यानंतर गिलनं सोशल मीडियावर अंपायरच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला होता. गिलला थर्ड अंपायरनं वादग्रस्त आऊट दिला होता. शुभमन गिलनं आयसीसीच्या कलम 2.7 चं उल्लंघन केलं आहे. हे कलम आंतरराष्ट्रीय सामन्याबाबत सार्वजनिक टीका किंवा अनुचित टिपण्णीशी संबंधित आहे. त्यामुळे गिलला आता दंड भरावा लागणार आहे.
ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून 209 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाला विजयासाठी 444 धावांचं लक्ष्य गाठायचं होतं, पण खेळाच्या पाचव्या दिवशी भारतीय क्रिकेट संघ कोलमडून पडला आणि ऑस्ट्रेलियानं WTC चा खिताब पटकावला. पण सामन्यानंतर ICC नं दोन्ही संघांवर कठोर कारवाई केली आहे.
एकीकडे पराभवातून टीम इंडिया सावरते न सावरते, तेवढ्यात टीम इंडियाला दुसरा धक्का बसला आहे. आयसीसीनं स्लोअव्हर रेटसाठी भारतीय क्रिकेट संघाला मॅच फिच्या 100 टक्के दंड ठोठावला आहे. म्हणजे, टीम इंडियाला संपूर्ण मॅच फी दंड म्हणून भरावी लागणार आहे. आयसीसीनं ऑस्ट्रेलियालाही स्लो ओव्हरसाठी रेटसाठी कठोर कारवाई करत दंड ठोठावला आहे. स्लो ओव्हरसाठी ऑस्ट्रेलियन संघाला 80 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे