सोलापूर : श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने सहाव्या वर्धापन दिनानिमित्त अनावश्यक खर्च न करता रेल्वे स्टेशनमधील 51 स्वच्छता कर्मचाऱ्यांना अन्नधान्य किट वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानने गेल्या 5 वर्षात गरिब, निराधार व झोपडपट्टी , कामगार वसाहतीत राहणाऱ्या लोकांना अन्नदान करून वर्धापनदिन साजरा करण्याची सामाजिक बांधिलकीची परंपरा कायम राखली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चित्रा हाँटेलचे प्रमुख धीरज जवळकर, नट्स मिठाईचे प्रमुख भावेश शहा, रेल्वे विभागचे सेफ्टी आँफिसर निरंजन मोरे, शिवाजी कदम, रेल्वे स्टेशन व्यवस्थापक एस के सिंग, श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या अध्यक्ष अक्षता कासट आदी मान्यवर उपस्थित होते. यावर्षी सोलापूर रेल्वे स्टेशनवर 51 स्वच्छता कर्मचाऱ्यांना ज्वारी, गहू, तांदूळ व साखर असे किट तयार करून वाटप करण्यात आले. सोलापूरातील दानशूर व्यक्तीच्या साहाय्याने हा उपक्रम राबविण्यात आला. यामुळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.
सुत्रसंचालन नर्मदा कनकी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुभांगी लचके, माधुरी चव्हाण, भारती जावळे, शिला तापडिया, अर्चना बंडगर, सारिका मदने, भाग्यश्री वंजारे, रुचा चव्हाण, सुजाता सक्करगी, ओम चव्हाण, राजु कोकाटे, शुभम कासट, दिपक बुलबुले, जगन्नाथ ढगे, अभिजित होनकळस, सौरभ करकमकर, निशांत वाघमारे, रुपेश उबाळे, रोहित पांढरे, केशव भैय्या, शंकर बिळीअंगडी, शामकुमार मुळे, सुरेश लकडे, कुष्णा डागा, नितीन कुलकर्णी, सागर हुंगन, यश भैय्या आदींनी परिश्रम घेतले.
■ चौकट : विविध सामाजिक उपक्रम राबविले : कासट
श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठान गेल्या 5 वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जोपासत विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. विद्यार्थी दत्तक योजना राबविण्यात येते. लाँकडाऊनमध्ये फुटपाथवर राहणाऱ्या बेघर लोकांना जेवण दिले.. तसेच काढा वाटप केले. पोलीस, डाँक्टर व स्वच्छता कर्मचारी यांना कोरोना योध्दा म्हणून गौरविण्यात आले. १० वी व १२ वी विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका, कम्पासपेटी व प्रशनपत्रिका मोफत वाटप करण्यात आले. विविध स्पर्धा घेतल्या. विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्काराने गौरविण्यात आले. असे प्रतिष्ठानचे संस्थापक महेश कासट यांनी सांगितले.