सोलापूर। अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव येथील दक्षिणमुखी जागृत मारुती मंदिरात शनि अमावस्या निमित्त शनिवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नववर्षाच्या पहिल्या महिन्याची अमावस्या ही शनिवारी आल्याने नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा अशी ख्याती असलेल्या गौडगाव येथील दक्षिणमुखी जागृत मारुतीरायाच्या दर्शनासाठी भक्तांनी लाखोंच्या संख्येने अलोट गर्दी केली होती दरम्यान शनी अमावस्या निमित्त गौडगाव येथील जागृत मारुती मंदिरात शनिवारी पहाटे तीन वाजता मारुतीचे महारुद्राभिषेक, पहाटे पाच वाजता नवग्रह पूजा, सकाळी सहा वाजता होम हवन, गजलक्ष्मी पूजा व यज्ञ कार्यक्रम हे धार्मिक विधी आणि महाआरती कार्यक्रम पार पडले. तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश तसेच संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक शनि अमावस्या निमित्त गौडगाव येथे दर्शनासाठी दाखल झाले होते. नववर्षाच्या पहिल्या महिन्यातील शनि अमावस्या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिराचे पुजारी ज्ञानेश्वर फुलारी यांनी यावेळी सांगितले. दरम्यान राज्य व परराज्यातून येणाऱ्या भक्त भाविकांसाठी अन्नछत्र मंडळात कलबुर्गी जिल्ह्यातील आळंद येथील खजुरी गावचे उद्योजक मिथुन आप्पाराव कलमाने, रवींद्र वानेगाव, किरण सदाशिव भंगरगी यांच्यावतीने महाप्रसादाचा आयोजन करण्यात आलं होतं. मोठ्या भक्तीमय व मंगलमय वातावरणात शनि अमावस्या गौडगाव मारुती मंदिरात पार पडला. भक्तांना कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर समितीच्या वतीने सुसज्ज असं दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीकांत खानापुरे, प्रकाश मेंथे, सिद्राम वाघमोडे, पीरप्पा पुजारी, अमसिध्द कोरे, भारत ननवरे, सेवक श्रीमंत सवळकोट, श्रीमंत मेत्रे मल्लिनाथ पाटील श्रीशैल कुंभार यांच्यासह मंदिराचे पदाधिकारी व सेवक यांची उपस्थिती होती.