No Result
View All Result
- सोलापुर :- दक्षिण सोलापुर तालुक्यातील बोरामणी मतदारसंघातील सर्व बंजारा समाज एकत्र येऊन उमाकांत राठोड प्रतिष्ठानच्या वतीने श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती हैदराबाद रोडवरील मार्केट यार्ड जवळ सेवालाल महाराज यांची मुर्ती प्रतिष्ठापना करुन भक्तीभावाने व जल्लोषात साजरी करण्यात आली. शुक्रवार दि . 17 फेब्रुवारी रोजी भाऊ महाराज उमरीगड़, बाळासाहेब शेळके, श्रिशैल नरोळे, बाळासाहेब वाघमारे, विश्रात गायकवाड, मफ्फू जमादार, आई प्रतिष्ठानचे प्रकाश राठोड याच्या प्रमुख उपस्थितीत श्री संत सेवालाल महाराज याच्या प्रतिमेचे पूजन करुन मार्केट यार्ड येथून श्री सेवालाल महाराज मूर्तीची दुपारी 2 वाजता भव्य मिरवणूक काढण्यात आली. मार्केट यार्ड येथून मिरवणूक निघुन मूळेगाव तांडा येथे रात्री 9 वाजता मिरवणूकीचा समारोप करण्यात आला. या मिरवणूकीत बंजारा समाजातील महिला, पुरुष याच्यासह बालगोपाळ व तरुण – तरुणी सुद्धा सहभागी झाले होते. माहिला पारंपारिक वेशभूषा परिधान करुन संगीताच्या तालावर ठेका धरुन बंजारा नृत्य करत होते. “सेवालाल महाराज की जय” च्या घोषणांनी वातावरण व सारा परिसर दणाणून गेले होता. मिरवणूकीनंतर महाप्रसादचे वाटप करण्यात आले.
- या मिरवणूकीत मूळेगाव तांडयाचे सरपंच विजय उमाकांत राठोड , उत्सव समितीचे अध्यक्ष रमेश चव्हाण, उपाध्यक्ष सुनिल चव्हाण, रतीलाल राठोड , राजकुमार राठोड, कार्याध्यक्ष अंकुश राठोड, सचिव तारसिंग राठोड, खजिनदार प्रकाश राठोड, सहखजिनदार विश्वनाथ राठोड, पिन्टू राठोड, सल्लागार अनिल राठोड, संपर्क प्रमुख राम पवार , सदस्य श्रीकांत राठोड , शिवाजी चव्हाण , बाबू ( मालक ) चव्हाण , नागनाथ जाधव, मनोज राठोड , शेवू पुढारी, दगडू राठोड, शाम जाधव, गणपत राठोड, तोळाराम नाईक आदि समाजातील ज्येष्ट नागरिक माहिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No Result
View All Result