सोलापूर : वारकरी परंपरेमध्ये “नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ |” या न्यायाने नित्य नेमाला खूप मोठे महत्व असून तो नेम निष्ठेने साजरा केला जातो. वारकरी भाविकांनी चैत्रवारी, रामनवमी, बीज, एकनाथ महाराज उत्सव, हनुमान जयंती,आषाढीवारी, कृष्ण अष्टमी, कार्तिक वारी, चातुर्मास हे सर्व उत्सव घरात बसून साजरे केले. महामारी कोरोनामुळे कुणीही शासन विरोधात भूमिका घेतली नाही शासनाला खूप मोठया प्रमाणात सहकार्यच केले.वारकरी भाविक आज सुद्धा शासनावर नाराज न होता आपआपली परंपरा सांभाळून टिकवायचा निर्धार करत आहे. परंतु शासनाने मंदिर, कीर्तन, भजन याला बंदी घातली आहे. सर्व वातावरण मोकळे झाले आहे.सर्व व्यवहार सुरळीत सुरु आहेत.
लग्न कार्यक्रमसाठी 50 जणांची परवानगी आहे. त्या प्रमाणे संत तुकाराम महाराज बीज व संत एकनाथ महाराज षष्ठी परंपरा विचारात घेऊन सर्व दिंडी व पालखीला मर्यादित भाविकाच्या उपस्थित – शासन नियम व अटी घालून नित्यनेम पूर्ण करणेसाठी परवानगी लवकरात लवकर जाहीर करावी कारण या दोन्ही संतांच्या विषयी भाविकांचे मनामध्ये खूप मोठा आदर असून संत परंपरा टिकावी या साठी आपले जीवन समर्पित करण्यासाठी भाविक वारकरी तयार असतात. त्यामुळे शासन नियम व अटी घालून नित्यनेम पूर्ण करणेसाठी परवानगी लवकरात लवकर जाहीर करावी ही नम्र विनंती,असे निवेदन ईमेल द्वारे मुख्यमंत्री यांना भाविक वारकरी मंडळाचे वतीने सुधाकर इंगळे महाराज ( राष्ट्रीय अध्यक्ष – भाविक वारकरी मंडळ ), भागवत महाराज चवरे ( राष्ट्रीय उपाध्यक्ष ) व पदाधिकारी यांनी पाठवले आहे.