सोलापूर – श्री चौडेश्वरी तोगटवीर क्षत्रिय नागरी सहकारी पतसंस्थेला २०२४-२५ या आर्थिक वर्षात संस्थेकडून झालेली वसुली, कर्जात व व्यवसायात भरीव वाढीमुळे संस्थेला ५ कोटी २५ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती पतसंस्थेचे चेअरमन विठ्ठल बडगंची यांनी दिली.
यंदाचे वर्ष हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरा होत आहे. या आर्थिक वर्षात पतसंस्थेने १०० कोटी व्यवसाय पूर्ण करुन पतसंस्थेच्या इतिहासात महत्वाचा टप्पा गाठला आहे. हे संस्थेच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे.

एकीकडे आर्थिक संस्था अडचणीत येत असताना सोलापूरची श्री चौडेश्वरी तोगटवीर पतसंस्था सभासद ठेवीदार कर्जदार यांचे विश्वास संपादन करित नुसता आपला दर्जा टिकवला नाही तर यशाचा शिखर गाठला आहे.
श्री चौडेश्वरी तोगटवीर क्षत्रिय नागरी सहकारी पतसंस्था ही सोलापूर जिल्ह्यातील अग्रणी पतसंस्था असून सध्या या संस्थेत एकूण ठेवी रु. २२७७६.६६ लांख इतके आहेत. एकूण कर्जे रु. १९२३२.९७ लाख इतके आहे. स्थापनेपासून ऑडीट वर्ग “अ” असून NPA चे प्रमाण ०% आहे. एकूण कर्जापैकी ९९% सुरक्षित कर्जे व सुरक्षित गुंतवणूक असलेल्या पतसंस्थेला महाराष्ट्र शासनाचा सहकारनिष्ठ पुरस्कार सह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. १५% लाभांश देणारी सोलापूरातील अग्रणी पतसंस्था आहे.
या यशात सभासद, ठेवीदार, कर्जदार, खातेदार, कर्मचारी व संचालक मंडळ -व्हा. चेअरमन चंद्रकांत रंगम, संचालिका उमा पुडूर, अंबिका उदगिरी व संचालक अरुण चिंता, लक्ष्मीकांत उदगिरी. अरविंद पुडूर, नरेंद्र बत्तुल. मल्लिकार्जुन खंडे, विलास बडगंची, शंकर कोतम. विष्णु म्याकल. अजय रंगम, विजयकुमार शिंपी, रूपसिंग राठोड. भगवंत फलमारे, अंबादास कंदीकोंडा, व्यवस्थापक राजेंद्र उदगिरी यांचा योगदान आहे.