सोलापूरः- दि.१२ एप्रिल २०२५ रोजी चैत्र पौर्णिमा निमित्त श्री. विरोबा व महालिंगराया देवाची यात्रा अश्विनी हॉस्पिटल समोर लष्कर येथे असलेल्या मंदिर परिसरात यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आलेली आहे या यात्रा महोत्सवानिमित्त अभिषेक महापूजा, पालखी सोहळा व पालखी भेट, ओव्या, वीर खेळणे, महाप्रसाद वाटप इत्यादी कार्यक्रम होणार आहे.
अश्विनी हॉस्पिटल समोरील, लष्कर मंदिर परिसरात सायं. ५.३० वा. ते रात्री १०.३० या. पर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी ६.०० वा. मुख्य सोहळा आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमांचे अध्यक्षस्थानी पालकमंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खा.प्रणिती शिंदे, .आ.देवेंद्र कोठे माजी आ.रामहरी रुपनवर, माजी आ.रामभाऊ सातपुते, भाजपाचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, काँग्रेसचे शहर अध्यक्षः चेतन नरोटे, माजी सभापती म.न.पा. सुरेश पाटील, आदि मान्यवर उपस्थित राहणार आहे. पत्रकार परिषदेस यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष अमोल बापू कारंडे, सुनिल बापू खटके, अण्णप्पा सत्तूबर ,भारत कटारे , गुरुभाई कावडे, रमेश तरंगे, सदाशिव व्हनमाने ,चंद्रकांत वाघमोडे, भगवान बनसोडे , शेखर बंगाळे इत्यादी उपस्थित होते.
श्री. बिरोबा महालिंगराया देवस्थानकडून सोलापूर शहर व जिल्हयातील सर्व भाविक मक्तांना विनंती आहे की, आपण सर्वांनी देवाच्या यात्रेस बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी यात्रा कमिटीच्यावतीने विनंती आहे.