ढोल-ताशांचा गजर अन्् लेझीमचा बहारदार खेळ
सायंकाळी गणरायाच्या स्वागतासाठी वरूणराजाचीही हजेरी
सोलापूर ः शहरातील मंगळवेढेकर चाळीतील श्री समर्थ तरूण मंडळाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या श्री समर्थ गणपती चा गुरुवारी जल्लोषी मिरवणुकीने आगमन सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी हजारों कार्यकर्त्यांनी अतिशय सुंदरपणे ढोल-ताशा चे वादन अन् लेझीमचा खेळ सादर करून नागरीकांची मने जिंकली. गणपतीची मिरवणुक ही अंतिम टप्प्यात आल्यानंतर वरूणराजानेदेखील मिरवणुकीत हजेरी लावली. मिरवणुकीत महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता.
मंगळवेढेकर चाळीतील श्री समर्थ तरूण मंडळाची स्थापना ही सन 1982 साली झालेली असून यंदाचे मंडळाचे 42 वे वर्ष आहे. मंडळाच्यावतीने सन 1993 साली साडेचार फुट उंचीच्या शाडूच्या गणेश मुर्तीची स्थापना करण्यात आली होती. या गणेश मुर्तीस अनेक वर्षे झाल्याने यंदाच्यावर्षी मंडळाचे आधारस्तंभ अरूण रोडगे यांच्या संकल्पनेत्ूान मंडळाच्यावतीने 11 फुट उंचीची फायबरची श्री समर्थ गणपती ची मुर्ती मुळचे सोलापूरचे असलेले व सध्या पुणे येथे स्थायिक असलेले मुर्तीकार अविनाश जिंदम यांनी तयार केलेली आहे.
नुतन मुर्तीचा आगमन सोहळ्यास गुरुवारी सकाळी सोलापूरचे श्रध्दास्थान असलेल्या श्री आजोबा गणपती येथून विधिवत पूजा करून प्रारंभ करण्यात आला. माजी महापौर शोभाताई बनशेट्टी, माजी उपमहापौर पद्माकर काळे, दिलीप कोल्हे, शिवसेना (उबाठा गट) चे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, परिवहन समितीचे माजी सभापती राजन जाधव, माजी नगरसेवक विक्रांत वानकर, सार्वजनिक मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष विनायक महिंद्रकर, एकनाथ घाडगे, विजय पुकाळे, मंडळाचे भाऊसाहेब रोडगे, मंडळाचे अध्यक्ष साहिल बावळे, आप्पासाहेब रोडगे, आण्णासाहेब रोडगे, रतन खैरमोडे, चिदानंद वनारोटे, काका मेंडके, राजू कुरेशी, शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष सुभाष पवार यांच्या हस्त्ो श्री समर्थ गणपतीची आरती करण्यात आली. त्यानंतर मिरवणुकीस प्रारंभ झाला. चांदीच्या आभुषणांनी सजविलेल्या श्री समर्थ गणपती ची छबी टिपण्यासाठी मिरवणुक मार्गावर नागरीकांनी गर्दी केली होती. मिरवणुक मार्गावरून जाणाऱ्या नागरीकांनी आपल्या मोबाईलमध्ये गणपतीचे सुंदर, आकर्षक रूप टिपल्याचे यावेळी दिसून येत्ो होत्ो. यावेळी मिरवणुकीच्या अग्रभागी कै. प्रभाकर रोडगे यांची प्रतिमा बग्गीत होती. त्यानंतर सोलापूरचा विश्वविनायक ढोल-ताशा पथक आणि त्यानंतर सुमारे 600 कार्यकर्त्यांचे लेझीमचे पथक होत्ो. विश्वविनायक ढोल-ताशा पथकातील तरूण-तरूणींनी अतिशय सुंदरपणे वादन करून नागरीकांची मने जिंकली. पांढरा शुभ्र रंगाचा नेहरू शर्ट आणि डोक्यावर भगवी टोपी परिधान केलेल्या कार्यकर्त्यांनी लेझीमचे आकर्षक डाव सादर करून शहरवासियांची मने जिंकली. यावेळी मिरवणुक मार्गावर श्री विविध मंडळांच्यावतीने श्री समर्थ गणपती ची पूजा करण्यात आली.
श्री आजोबा गणपती मंदीर येथून सुरुवात झालेली ही मिरवणुक माणिक चौक, श्री सोन्या मारूती, दत्त चौक, राजवाडे चौक, नवी पेठ, पारस इस्टेट, मेकॅनिकी चौक, नवी वेस पोलिस चौकी, सरस्वती चौक मार्गे लकी चौक येथे मंगळवेढेकर चाळीतील गणेश मंदीराजवळ आल्यानंतर सायंकाळी वरूणराजानेदेखील हजेरी लावली. यावेळी पावसामध्ये कार्यकर्त्ो तल्लीन होऊन नाचत होत्ो.
यावेळी मंडळातील बापू रोडगे, राजू नकात्ो, सचिन बावळे, दादू रोडगे, सिध्दू पाटील, राजू जगताप, बुवा नकात्ो, शशिकांत तरटे, अजय गोडसे, मेघराज पसारे, अमर देवरनावदगी, दत्ता कासेगावकर, बाळू नकात्ो, श्रीपाद रणदिवे, सौरभ माने यांच्यासह मंडळातील हजारों कार्यकर्त्ो उपस्थित होत्ो.