दिनांक ७ ते ११ जुलै २०२४ दरम्यान इंदौर येथे सुरू असलेल्या ४० व्या सब जूनियर व ५० व्या जूनियर नॅशनल अक्वॅटिक चैम्पियनशिप २०२४ या राष्ट्रीय डायव्हींग स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना सोलापूरच्या श्रावणी प्रताप सूर्यवंशी हिने ग्रुप-१, १९ वर्ष वयोगटात डायव्हींग- हायबोर्ड, या क्रिडा प्रकारात २८०.८० गुणासह गत वर्षीची मध्यप्रदेशची नॅशनल गेम्स सुवर्ण पदक विजेती पलक शर्मा हिला दुसऱ्या क्रमांकावर ठेवीत सुर्वण पदक पटकावले आहे.
श्रावणीने आजवर डायव्हिंग प्रकारामध्ये शालेय आणि फेडरेशनच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या स्पर्धेत राज्य पातळीवर १६ गोल्ड आणि २ सिल्वर आणि १ ब्रांज पदक मिळवले आहे तसेच राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत तिने ८ गोल्ड, ४ सिल्वर आणि २ ब्रांज पदके मिळविली आहेत. तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने २ गोल्ड, १ सिल्वर आणि १ ब्रांज पदक मिळवले आहे.
या विजयाचे श्रेय श्रावणीचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच श्रीकांत शेटे यांना जात असून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली श्रावणी डायव्हींगचे धडे घेत आहे.