सोलापूर : भारत स्वतंत्र दिनाच्या 75 व्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त इंद्रभवन येथे आज महापालिकेचे आयुक्त पि.शिवशंकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर मा आयुक्त यांच्या समवेत अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांनी तंबाखू मुक्तीची शपथ यावेळी घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे,उपायुक्त विद्या पोळ,उपयुक्त मच्छिंद्र घोलप,सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार,सहाय्यक आयुक्त विक्रम पाटील,सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत, सहाय्यक नगर रचना संचालक केशव जोशी, लक्ष्मण चलवादी माजी सभागृह नेते श्रीनिवास करली,माजी नगरसेविका मनीषा हुच्चे, माजी नगरसेविका निर्मला तांबे तसेच अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.भारत स्वतंत्र दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त सोलापूर वासीयांना उद्देशून भाषण करताना महापालिका आयुक्त पि.शिवशंकर म्हणाले ” जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थी असताना माझा सत्कार झाला होता.
आज मी 75 व्या भारताच्या स्वातंत्र दिनाचा अमृत महोत्सव साजरा करतोय ,हे केवळ स्वतंत्र भारताच्या सविधाना मुळे शक्य झाल म्हणत पालिका आयुक्तांनी 15 ऑगस्टच्या दिवशी ध्वजारोहणा नंतर कर्मचा-यांच्या वेतनात वाढ करण्या बरोबरच निवृत्त व कार्यरत महापालिका कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ तसेच रोजंदारी कामगारांच्या वेतनात 25 रुपयांनी वाढ करण्याची घोषणा यावेळी महापालिका आयुक्तांनी केली. त्याचबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणालीचा वापर करून प्रशासकी यंत्राना अधिक गतीमान करणार असल्याचे घोषणा महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांनी केली . यावेळी आयुक्त यांनी सोलापूर वासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.