कोणतीही अडचण असल्यास संपर्क साधा : मंगेश चिवटे
सोलापूर : मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कक्षाचे मार्गदर्शक खासदार डॉ.श्रीकांत शिंदे याच्या आदेशा नुसार शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष समन्वयक महाराष्ट्र राज्य मंगेश चिवटे यांनी सोलापूर दौरा केला त्यामध्ये त्यांनी जिल्हातील आरोग्य सेवा देणारी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा संपर्क प्रमुख, मनीष काळजे इतर पदाधिकारी याच्याकडून जिल्हाच्या कामाचा आढावा घेतला.
आरोग्य विषयात योग्य मार्गदर्शन व सूचना केल्या तसेच माघील कामाकजाचा आढावा घेऊन जिल्हा संपर्क समन्वयक मनिष काळजे, महानगरपालीका विरोधी पक्ष नेते अमोल शिंदे, नगरसेवक मनोज शेजवाल, शिवसेना महिला अघाडी उपजिल्हाप्रमुख प्रिया बसवंती व सर्व वैद्यकिय मदत कक्ष पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सेवालय या वैद्यकिय सेवा वाँर रुम येथे मंगेश चिवटे यांनी सदिच्छा भेट दिली. प्रसंगी उपस्थितांनी सोलापुर च्या वैद्यकिय अडचणी सांगितल्या लवकर ते पुर्ण करण्याचे अश्वासन मंगेश चिवटे यांनी केले .