लोकशाहीमध्ये एका मताला किती किंमत आहे हे सोलापूर महापालिकेत देखील दिसून येत आहे . वैभव हत्तुरे यांच्या रूपाने राष्ट्रवादीचा महापालिकेत एकमेव नगरसेवक निवडून आला. त्यामुळे हत्तुरे यांना सोबत घेऊन शिंदे सेनेचे,चार काँग्रेसचे दोन अशा सात नगरसेवकांच्या माध्यमातून एक स्वीकृत नगरसेवक निवडून आणण्याचा शिंदे सेनेचे गटनेते अमोल शिंदे आणि काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांचा डाव फसला. महापालिकेचे 102 नगरसेवक आहेत. यामध्ये भाजपचे 87 नगरसेवक निवडून आले आहेत. यातील एक नगरसेविका शालन शिंदे जेलमध्ये आहे. एमआयएमचे आठ नगरसेवक निवडून आले आहेत. तौलनिक संख्याबळानुसार स्वीकृत नगरसेवकांच्या मतदान ऐवजी थेट नियुक्त केल्या जातात. दहा नगरसेवकांनी पाठीमागे एक स्वीकृत नगरसेवक देता येतो. मात्र भाजपचे 90 नगरसेवक नाहीत. त्यामुळे अपूर्णांक पद्धतीने जास्ती सदस्य संख्या असलेल्यांचा विचार केला जातो. शिंदे सेनेचे चार काँग्रेसचे दोन आणि वैभव हत्तुरे असे मिळून सात जण एकत्र आले असते आणि त्यांनी तशी गट नोंदणी विभागीय आयुक्त कडे केली असती तर त्यांचा एक स्वीकृत नगरसेवक निवडून आला असता मात्र ही त्यांची खेळी भाजपाला लक्षात आली. गणितानुसार भाजपचा नववा नगरसेवक धोक्यात होता. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीच्या वैभव हत्तुरे याला आपल्या कळाला लावून तातडीने पुण्यात जाऊन त्याच्यासोबत गट नोंदणी केली. पालकमंत्री जयकुमार गोरे,आमदार देवेंद्र कोठे यांच्या या चाणक्य नीति मुळे अमोल शिंदे आणि चेतन नरोटे यांनी गाफील राहिल्याचा त्यांचा डाव फसला आहे.
