नीलम गोऱ्हेंनी मातोश्रीची काळी बाजू उजेडात आणल्याने बीएमसीचे ‘टक्कापुरुष’ उद्धव ठाकरेंना भलताच धक्का बसला आहे, असा घणाघात ज्योती वाघमारे यांनी केला. मर्सिडिज गाडीच नव्हे तर आदुबाळाची बाबागाडीसुद्धा बीएमसीच्या टक्क्यांमधून येत होती हे खरे आहे का?, असा सवालही ज्योती वाघमारे यांनी उपस्थित केला आहे.
‘गाडीच नव्हे तर ‘मातोश्री-2’ची माडी, मोठे मन नसतानाही मोठ्या काठाच्या साड्या नेसणाऱ्या वहिनींची रेशमी साडीसुद्धा पदाधिकाऱ्यांकडून खंडण्या गोळा करून घेतली जात होती हे जुन्या लोकांकडून आम्ही ऐकलंय, असं ज्योती वाघमारे यांनी सांगितले. महाराष्ट्रात ऊन वाढले की गुलाबी थंडीची मजा घ्यायला तुम्ही जाता त्या लंडनमधल्या प्रॉपर्ट्या कशा झाल्या?, हे महाराष्ट्राला सांगणार का?, वयाच्या तिशीतच कोणतीही नोकरी उद्योग न करता आदित्य ठाकरेंकडे करोडोची मालमत्ता कशी आली याचा हिशेब जनतेला देणार का?, असा प्रश्नही ज्योती वाघमारे यांनी उपस्थित केला.