येस न्युज नेटवर्क : हिवाळी अधिवेशनाच्या आधीच मंत्रिमंडळ विस्तार केला जाण्याची दाट शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तार करत असताना महामंडळाचे सुद्धा वाटप केलं जाणार आहे. तशा स्वरूपाची चर्चासुद्धा शिंदे गट आणि भाजपमध्ये सुरू झालेली पाहायला मिळते. मात्र मंत्रिमंडळ विस्तार करत असताना शिंदे गटासोबत असलेले सर्वच आमदारांना खूश केल जाणार का हे पाहावं लागणार आहे. विस्तार करत असताना सरकारची डोकेदुखी वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नेमका विस्तार कसा करायचा यावर आता चर्चा सुरू आहे.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारला शंभर दिवस उलटून गेलेले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी असा सातत्याने प्रश्न विचारला जातोय. हाच मंत्रीमंडळ विस्तार हिवाळी अधिवेशनाच्या आधी होण्याची दाट शक्यता आहे. तसं सुतोवाच स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. अधिवेशनात विरोधक आक्रमक होतील. त्यामुळे विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मंत्रीमंडळ विस्तार केला जाण्याची दाट शक्यता आहे. कारण आता एकाच मंत्र्यांकडे अनेक विभागांची जबाबदारी आहे. त्यात राज्यमंत्री नसल्याने विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये जर एकाच वेळीप्रश्न उपस्थित केला. तर त्याला उत्तर कसं द्यायचं असा प्रश्न निर्माण होत आहे.