महिला व बाल कल्याण मंत्री ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण!
श्रीक्षेत्र अरणच्या सुनिता हरिदास रणदिवे (आदर्श माता ) यांना पंढरपूर येथे महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री मा. ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते पद्मविभूषण मा. शरदचंद्र पवार साहेब यांच्या मातोश्रींच्या नावे दिला जाणारा शारदाई पुरस्कार २०२४ समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.
अजिंक्य रणदिवे (नगरपालिका मुख्याधिकारी) यांच्यावर चांगले संस्कार करुन महाराष्ट्राला उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी दिल्याबद्दल कृतज्ञतापूर्वक जाहीर समारंभात हा पुरस्कार अजिंक्यच्या मातोश्री सुनिता हरिदास रणदिवे यांना प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या वेळी घोषित झालेल्या पुरस्काराचे आज वितरण करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.