सोलापूर :प्रतिनिधी: (गिरीश गोरे) सोलापूर विज्ञानाचा आधार घेतल्याशिवाय शेती सुधारू शकत नाही म्हणूनच नान्नज येथील दत्तात्रय काळे आणि काळे आणि काळे कुटुंबीयांनी केलेली द्राक्ष क्रांती महत्त्वपूर्ण ठरते असे प्रतिपादन माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी शुक्रवारी केले शनिवारी केले. किंग बेरी ही द्राक्षाची नवीन जात पुढच्या वर्षी लंडनच्या बाजारात निश्चितच पाहायला मिळेल अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली .नान्नज येथील कृषिभूषण दत्तात्रय काळे यांनी विकसित केलेल्या किंगबेरी द्राक्ष वाणाचा लोकार्पण सोहळा शनिवारी माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते व सोलापूरचे माजी खासदार सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला महाराष्ट्रातील एकूण द्राक्ष क्षेत्रापैकी 60 ते 70 द्राक्षांचे वाण येथूनच पुरविले जात असल्याचे दत्तात्रय काळे यांनी स्पष्ट केले .जे विकते ते पिकवले पाहिजे असे सांगत दत्तात्रय काळे म्हणाले की, द्राक्ष मण्यांचा राजा म्हणजेच किंगबेरी चे एकरी उत्पन्न 12 ते 14 टन मिळते रंगीत द्राक्षांना जगात सर्वत्र जास्त मागणी आहे .या द्राक्षांमध्ये 11 टक्के अँथोसायनिन असल्याने कर्करोग ग्रस्तांना हे द्राक्ष अधिक उपयुक्त असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशाच्या उत्पन्नात भर घालण्यासाठी निर्यातक्षम द्राक्ष वाण शोधून उत्पादन घेणारे व राज्यभर ही नवीन द्राक्ष वाण पोहोचविणारे दत्तात्रय काळे यांचे योगदान मोठे असल्याचे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले .दत्तात्रय काळे आणि नानासाहेब काळे यांनी विकसित केलेली किंगबेरी ही द्राक्षाचे सहावी जात आहे या किंगबेरी चे वैशिष्ट्य म्हणजे द्राक्षाचा मणी 45 ते 50 मिलिमीटर लांब आणि 24 ते 25 मीटर व्यासाचा असून त्याची चव अत्यंत सुरेख आहे हे द्राक्ष निर्यातीसाठी अतिशय उपयुक्त असून शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देणारे आहे असेही कृषिभूषण दत्तात्रय काळे यांनी स्पष्ट केले.