अविनाश व्यंकटेश कुलकर्णी / सोलापूर
जेष्ठ व कर्तृत्वासंपन्न लोकनेते शरदराव पवार हे राजकारणातील व समाजकारण।तील विलक्षण रसायनआहे भविष्याचा वेध घेणारी विकासाची दृष्टी , प्रचंड लोकसंग्रह, उतुंग कर्तृत्व, कठोर परिश्रम आणि सामान्य माणसाचा सर्वांगीण विकास हा राजकारणाचा केंद्रबिंदू या सर्व गुणांचं एकत्रीकरण शरद पवार यांच्यात दिसते त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा त्यांच्या आयुष्यात शंभर शरद ऋतू यावेत , ही उत्कट इच्छा.
शरदराव यांनी युवक काँग्रेस कार्यकर्ता म्हणून पं नेहरू यांच्या निधनानंतर त्यांच्या विचाराची ज्योत संपूर्ण महाराष्ट्रात प्रज्वलित राहावी म्हणून नेहरू ज्योत घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात संचार केला सोलापुरात या ज्योतीचे मध्यरात्री आगमन झाल्यानंतर नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले होते तेव्हापासून गेली 56 वर्षं शरदराव आणि सोलापूरकर यांचा ऋणानुबंध विणला गेला सोलापूरचे अनेक वर्षं पालक मंत्री म्हणून यशस्वीपणे काम पहिले होते सोलापूरशी त्यांचे जवळ कीचे नाते आजही कायम आहे हे त्यांनी अलीकडेच आपले वय विसरून सामाजिक जाणिवेतून कोरोना महामारी च्या संकटाशी सामना करण्याबाबत सोलापुरात येऊन शासकीय अधिकाऱ्याकडून परिस्थितीची माहिती घेऊन योग्य मार्गदर्शन केले व औषधे उपलब्ध करून दिली.
1993 च्या किल्लारी परिसरात झालेल्या भूकंपानंतर भूकंपग्रस्तना तात्पुरता निवारा , वैद्यकीय मदत , भोजन व अन्य मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री असताना सोलापुरात 15 दिवस तळ ठोकला होता दिवसभर भूकंपग्रस्त भागात फिरून अडचणी समजावून घेऊन रात्री ते सोलापुरात मुक्कामासाठी येत असत त्यानंतर रात्री व सकाळी शासकीय अधिकाऱ्यांना व आपल्या कार्यकर्त्यांना भूकंपग्रस्तांपर्यंत तातडीची मदत पोहोचवण्यासाठी सूचना देत त्याकाळात राज्याचा कारभार सोळापुरातूनच ते पाहत असत आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे त्यांचे कमालीचे कौशल्य सोलापूर, लातूर व अन्य भागातून आलेल्या पत्रकारांना पाहायला मिळाले सोलापूरच्या विकासाचे शिल्पकार असलेल्या सुशीलकुमार शिंदे यांना पोलीस विभागातून राजकारणात आणून 1974 मध्ये करमाळा विधानसभा पोटनिडणुकीत चांगले मताधिक्य मिळवून निवडून आणले त्यामुळे शरद पवार व आपले गुरू शिष्याचे नाते असल्याचे शिंदे भाषणात स्पष्टपणे सांगतात शिंदे यांच्यामुळे सोलापूरला मुख्यमंत्री व केंद्रीय गृहमंत्री पदाचा सन्मान मिळू शकला उजनी धरण होण्यापूर्वी सोलापूरचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी शरदराव यांनी पालक मंत्री म्हणून काम पाहताना पवना धरणातून सोलापूर साठी पाणी सोडण्याची महत्वपूर्ण भूमिका निभावली सोलापूर महापालिकेच्या सर्व जाती जमतीमधील व्यक्तींना काम करण्याची संधी त्यांनी सर्वधर्मसमभाव भूमिकेतून देऊन नवीन नेतृत्व निर्माण करण्यात मोलाची भूमिका बजावली सोलापुरातील यंत्रमागधारक, जिल्ह्यातील द्राक्ष , डाळिंब व बोर उत्पादक चे प्रश्न त्यांनी तळमळीने सोडवले जिल्ह्यातील अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना त्यांनी मदतीचा हात दिला सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने सुरु केलेली फळबाग योजना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात रोजगार हमी योजनेखाली राबवून फळबाग लागवडीत महाराष्ट्राला अग्रस्थानी नेले होते सोलापूर विद्यापीठ उपकेंद्रासाठी केगाव येथील पोलीस विभागाची 35 एकर जागा मंजूर करून प्रलंबित राहिलेला जागेचा प्रश्न सोडविला या उपकेंद्राचे सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना सोलापूर विद्यापीठात रूपांतर झाले पवार साहेब पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर विविध कारणांमुळे सोलापुरात लवकर येऊ शकले नव्हते त्यामुळे प्रदेश कॉंग्रेसच्या बैठकीत तत्कालीन काँग्रेस शहर अध्यक्ष युनूसभाई शेख यांनी नाराजी दर्शवल्यानंतर दादासाहेब रुपवते यांनी सोलापूरच्या लोकांनी नाराज व्हायाचे कारण नाही कारण सोलापूरचा माणूस राज्याचा मुख्यमंत्री झाला आहे अशी समजू त काढली होती अल्पसंख्याक समाजातील युनूसभाई यांना पुढे पवार यांनी विधानपरिषदेवर पाठवून आमदार केले हेही विसरता येणार नाही.
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांचा त्यांना राजकीय अभ्यास होता कार्यकर्त्यांची नावेही तोंडपाठ आहेत सोलापुरातील जेष्ठ , जुन्या पत्रकारांशी विविध विषयावर चर्चा करून ते माहिती घेत असत जिल्ह्यातील मागासवर्गीय व भटक्या विमुक्त जमातीचे प्रश्न सोडवण्यासाठी या समाजातील नेत्यांशी अजूनही आपुलकीच्या भावनेने चर्चा करतात त्यामुळे पवार साहेब सत्तेवर असो अथवा नसो कार्यकर्त्यांची गर्दी कायम असते हे विशेष