नवी दिल्ली : शेती प्रश्नाच्या मुद्यावरुन कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह ऊस आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांची ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत. या सर्व प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे. इथेनॉल बंदीचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे त्या संदर्भात भेट घेऊन साखर कारखानदारांची समस्या मांडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्यात निर्माण झालेला इथेनॉल प्रश्न याबाबत अमित शाह यांच्याशी चर्चा करणार आहे. इथेनॉल बंदीचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्या संदर्भात भेट घेत साखर कारखानदारांची समस्या मांडणार आहे. या निर्णयाचा मोठा फटका हा साखर कारखादारांना बसणार आहे. त्या संदर्भात भेट घेत निवेदन देणार आहे.राजेश टोपे देखील अमित शहांच्या भेटीसाठी मागील दोन दिवसांपासून दिल्लीत आहे. अमित शाहांसोबत कालच बैठक होणार होती. मात्र लोकसभेतील सुरक्षा व्यवस्थेवरून सुरू असलेल्या गदारोळामुळे काल भेट झाली नाही.