येस न्युज मराठी नेटवर्क : एसीबीने माझ्या पतीवर गुन्हा दाखल केल्याची बातमी समजल्यापासून मला शरद पवार साहेबांची खूप आठवण येत आहे, ते माझे बापच आहेत” असं म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मनातील भावना व्यक्त केल्या. साडेतीन वर्षांपूर्वी सिल्व्हर ओकमध्ये घडलेल्या किस्स्याची आठवण चित्रा वाघ यांनी सांगितली.
काय म्हणाल्या चित्रा वाघ?
“आज मला पवार साहेबांची आठवण येते, साहेब मला तुमची खूप आठवण येते सकाळपासून…. 5 जुलैला गुन्हा दाखल झाला, मला चांगलं आठवतंय आणि 7 जुलै… त्या दिवशी ईद होती.. 2017… मी साहेबांकडे गेले होते, सिल्व्हर ओकला बोलावलं होतं त्यांनी. माझा बापच आहे. त्यांनी बोलावून घेतलं मला, आणि मी एफआयआरची कॉपी त्यांना दिली, पंचनाम्याची कॉपी मी दिली. साहेबांनी सगळं वाचलं, म्हणाले चित्रा याच्यात तुझा नवरा कुठेच नाहीये. मी म्हटलं साहेब हेच आहे.” अशी आठवण चित्रा वाघ यांनी सांगितली.