राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर देशभरातील राजकारण ढवळून निघाले होते. त्यानंतर आज मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात निवड समितीनेही त्यांचा राजीनामा फेटाळला होता. तसेच अध्यक्ष पदावर शरद पवार यांनीच कायम रहावे असा ठराव मंजूर केला होता. या सगळ्या घडामोडी आणि जनभावनांचा विचार करून मी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेत असल्याचे शरद पवार यांनी जाहीर केले.