मुंबई : एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवी यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. फडणवीसांच्या उपमुख्यमंत्रीपदावरुन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बोचरी टीका केली आहे. बिचारे देवेंद्र फडणवीस यांचा केंद्रातील नेतृत्वाने शंकरराव चव्हाण केला, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे. दिल्लीहून फडणवीस यांना आदेश आले म्हणून ते मुख्यमंत्री झाले म्हणून असं ट्वीट मी केलं आहे. फडणवीस यांचा अपमान करायचा होता म्हणून उपमुख्यमंत्री पद दिलं आहे का हे केंद्रात विचारायला हवं. सरकार वर नियंत्रण ठेवायचे होते तर चंद्रकांत पाटील पण होते, असं देखील ते म्हणाले. ते आज पुण्यात बोलत होते.