अकलूज : शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज व इंक्युबेशन सेंटर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने “सोलापूर स्टार्टअप यात्रा: ध्यास नाविन्याचा शोध नव उद्योजकांचा” या अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आला. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जयसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रेरणेने निमंत्रक सौंस्थेमार्फत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना डॉक्टर बागडे म्हणाले की महाविद्यालय आणि संस्था नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे या अनुषंगाने तालुक्यातील विद्यार्थी विद्यार्थिनी आणि नवउद्योजक यांना सामावून घेऊन उद्योगाचे प्रशिक्षण देण्यासाठी संस्था तत्पर राहील. यावेळी बोलताना तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक श्री जितेंद्र बाजारे यांनी विद्यार्थी आणि नवउद्योजकांना त्यांना आलेल्या अनुभवांची गाथा कथन केली तसेच उद्योजकांच्या माहितीसाठी त्यांनी आपला जीवन प्रवास सांगितला आणि यामध्ये व्यवसाय कौशल्याचा कस उद्योगांमध्ये कसा लागतो याची देखील माहिती दिली.
यावेळी सोलापूर विद्यापीठाचे इनोवेशन, इंक्युबेशन अँड लिंकेजेसचे डायरेक्टर डॉ.सचिन लड्डा हे देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉक्टर लड्डा म्हणाले की तालुक्यातील आणि ग्रामीण भागातील नव युवकांना आणि युवतींना व्यवसायासाठी आणि नवउद्योगासाठी लागणारे प्रशिक्षण आणि भांडवल विद्यापीठातर्फे पुरवण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. ही यात्रा दिनांक 22 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी दहा वाजता यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा येथे दाखल होणार आहे.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे समन्वयक श्री व्ही एम अवाड, तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेतले. यावेळी विद्यापीठाच्या उद्यम इंक्युबेशन सेंटरचे मॅनेजर श्री. श्रीनिवास पाटील आणि श्रीनिवास नलगेशी तसेच बसवराज सुतार उपस्थित होते.