सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित कै. जे.टी. कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या 14 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये आज भंडारी मैदान येथे झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात एचपीसी बार्शी संघाने के पी सी ए सोलापूर संघाचा सहा विकेटने पराभव केला.
या स्पर्धा शांभवी कन्स्ट्रक्शन यांनी पुरस्कृत केल्या आहेत.
केपीसी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 30 षटकात सर्व बाद 80 धावा केल्या.
यामध्ये अप्पू स्वामी याने 24 धावा व ओम साई याने 18 धावा केल्या.
एचपीसीसी बार्शी संघाकडून गोलंदाजी मध्ये अर्णव जगदाळे याने तेरा धावा देऊन दोन बळी आर्यन जाधव याने वीस धावा देऊन दोन बळी व गौरव गाडेकर याने चार धावांमध्ये एक बळी बाद केला.
एचपीसीसी बार्शी संघाने 21 षटकांमध्ये चार गड्यांच्या मोबदल्यात 64 धावा केल्या असताना पाऊस सुरू झाल्याने पुढे खेळ होऊ शकला नाही.
त्यामुळे सिम्पल रन रेट च्या सूत्रानुसार बार्शी एचपीसी संघाला विजयी घोषित करण्यात आले.
बार्शी एचपीसी संघाकडून अभिषेक देशमुख 34 धावा, अवनेश बजाज याने 14 धावा केल्या .
केपीसीए संघाकडून ओम साई याने सहा धावा दोन बळी, महिंद्र इंजामरे याने 25 धावा एक बळी घेतला.
सामनावीर पुरस्कार अभिषेक देशमुख याला देण्यात आला