सोलापूर : उत्तर सोलापूर काँग्रेस तालुकाध्यक्ष शालिवाहन माने यांनी शुक्रवारी त्यांच्या पदाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला व बाजार समिती निवडणुकीमध्ये आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला बिनिशर्त पाठिंबा दर्शविला आहे.
शालिवाहन माने यांनी प्रवेश करताना कोणतीही अट न ठेवता बिनिश्वर्त पाठिंबा दिलेला आहे. त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी काँग्रेस कमिटीकडे उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा सुपूर्द केलेला आहे. यावेळी आमदार सुभाष देशमुख, उत्तर सोलापूर भाजपा तालुका अध्यक्ष राम काका जाधव, हनुमंत कुलकर्णी, जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख, डॉक्टर चनगोंडा हविनाळे, रमेश आसबे, धनेश आचलारे, रामप्पा चिवडशेट्टी, दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष संगप्पा करके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते