येस न्युज मराठी नेटवर्क : स्टाईलमंत्रा घेऊन येत आहे सोलापूर च्या शक्तिगाथा.. ही फोटो सिरीज नवरात्रीचे रंग, किंवा देवतांचे मेकअप या वर आधारित नसून सोलापूर शहर , जिल्ह्यातील रियल लाईफ मधील दुर्गांचे मनातील रूप आहे. स्टाईलमंत्राने सोलापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील पदे भूषाविणाऱ्या महिलांना त्यांच्या मनातील रूपाला चित्रात उतरवण्याचा छोटा प्रयत्न केला आहे. ही सर्व रूपे या सर्व कर्तृत्ववान महिलांच्याच कल्पना आहेत. त्यांना सत्यात उतरविण्याचा प्रयत्न ह्या नवरात्रोत्सवात केला आहे सोनल पांचाळ आणि रोहित इंदापुरे यांनी.
आजच्या शक्ति दुर्गा : प्रिसीजन फाउंडेशनच्या माध्यामातून सोलापुरात दर्जेदार, सामाजिक, शैक्षणिक आणि संस्कृतिक उपक्रम राबवणार्या सुहासिनी शहा