माढा तालुक्यातील संत शिरोमणी सावता महाराज यांची संजीवन समाधी असलेल्या अरण तीर्थक्षेत्राला शासनाने अ वर्ग दर्जा दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या शिखर समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा आदेश सार्वजनिक बांधकाम 13 मे रोजी प्रसिद्ध केला आहे.
कांदा मुळा भाजी.. अवघी विठाई माझी.. लसूण मिरची कोथिंबिरी… अवघा झाला माझा हरी.. असा कर्मयोग सांगत संत सावता माळी यांच्या अरण तीर्थक्षेत्राला शासनाने दिला अ वर्ग दर्जा, जीआर निघाला माळी यांनी अरण मध्ये भक्तीचा मळा फुलविला. बऱ्याच दिवसापासून अरण मधील अनेक विकास कामे प्रलंबित आहेत. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच अरणचा 100 कोटी रुपयांचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा जाहीर केला असून त्याला निधी देखील देण्याचे आश्वासन दिले आहे. आता प्रत्यक्ष अ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात अनुदान देखील प्राप्त होईल. आषाढी वारी निमित्त दरवर्षी प्रत्येक संतांच्या पालख्या पंढरीला विठुरायाच्या भेटीसाठी जातात. मात्र संत शिरोमणी सावता महाराज हे एकमेव संत आहेत की ज्यांच्या भेटीसाठी साक्षात पांडुरंग अरण मध्ये येतात, अशी आख्यायिका आहे. त्यामुळेच आषाढी वारी आणि गोपाळकाला संपल्यानंतर पांडुरंगाची पालखी तीन दिवस अरण ला संत सावता माळी यांच्या भेटीला येते. आणि त्यावेळी अरणमध्ये श्रीफळ हंडी सोहळा होतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र विकासासाठी लक्ष दिल्यामुळे अरण चा कायापालट होईल आणि संत शिरोमणी सावता महाराज यांच्या तीर्थस्थळाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल हे नक्की