गवळी वस्ती दमानी नगर येथील राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या “शाहिरी शिवदर्शन” या कार्यक्रमात महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शाहीर रामानंद उगले यांनी शाहिरी आणि पोवाड्याच्या माध्यमातून शिवजन्मोत्सवापूर्वीचा आणि त्यानंतरचा इतिहास सादर करून शिवप्रेमीची मने जिंकली. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची पुजा करून पोवाड्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रतिष्ठानचे संस्थापक विजय घुले आणि टीमने रेकॉर्डब्रेक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.अंगावर शहारे आणणारा हा कार्यक्रम पाहण्यासाठी या भागातील बहुसंख्य नागरिकांनी गर्दी केली होती. कार्यक्रमाचे नेटके नियोजन करून राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानने सर्वांची वाहवा मिळविली. शाहीर रामानंद उगले यांचा सोलापुरातील हा पहिलाच कार्यक्रम होता.बालशाहीर स्वानंद धुमाळ याने आपल्या आवाजात सादर केलेला पोवाडा सर्वांसाठी कौतुकाचा विषय ठरला.