इन्शुरन्स क्षेत्रात सोलापूर जिल्ह्यात केला नवा विक्रम तयार
व्हिएतनाम मधील दनांग शहरात MDRT बद्दल विशेष सन्मान
बार्शी: विमा व्यवसायातील जागतिक पातळीवरील प्रतिष्ठेचा म्हणजे पद्मविभूषण समजला जाणारा MDRT-COT हा गौरव पटकावणे ही बार्शी करांसाठी आणि त्यांच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. आमचे सहकारी मार्गदर्शक आणि मित्र लोकमतचे पत्रकार शहाजी फुरडे-पाटील यांनी सलग दुसऱ्या वर्षी Tata AIA Life Insurance या क्षेत्रातील सर्वोच्च MDRT-COT (Court Of Table) मानांकन मिळवले आहे. त्यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
विमा क्षेत्रातील मानांकना बाबत सोप्या भाषेत सांगायचे म्हटले तर MDRT म्हणजे (पद्मश्री) COT म्हणजे (पद्मविभूषण) आणि TOT म्हणजे (भारतरत्न)
बार्शी शहरात धनसंपदा वेल्थ मॅनेजमेंटच्या माध्यमातून ते विमा आणि म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे कार्य उत्कृष्टरीत्या पार पाडत आहेत.
शहाजी फुरडे-पाटील : एक नाव, अनेक ओळखी!
शहाजी फुरडे-पाटील हे नाव उच्चारताच दैनिक लोकमत, मातृभूमी प्रतिष्ठान आणि भगवंत मल्टीस्टेट आणि बार्शी तालुका क्रिकेट असो. या बार्शी तालुक्यातील महत्त्वाच्या संस्था नजरेसमोर येतात. मात्र, यंदा त्यांनी एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला आहे. टाटा लाइफ इन्शुरन्समध्ये 2024 मध्ये त्यांनी सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक विमा व्यवसाय करत एका वर्षात 4 वेळा MDRT म्हणजेच COT मानांकन मिळवले. यंदा ही सहा महिन्याच्या आतच स्वतः व मुलगा मालोजी शहाजी फुरडे-पाटील यांनी ही MDRT मान मिळवण्याचा विक्रम रचला आहे.
TATA – विश्वासाचे प्रतिक आणि फुरडे-पाटील यांची जोड
टाटा हा ब्रँड म्हणजे विश्वास आणि विश्वास म्हणजे टाटा! बार्शीतील फुरडे-पाटील यांचे नाव या ब्रँडसोबत जोडले गेल्यानंतर ग्राहकांचा त्यांच्यावर अधिक विश्वास बसला. त्यामुळे अनेकांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मान्यवरांनी विमा पॉलिसी घेण्यास सुरुवात केली.
कांदलगाव (ता. बार्शी) या ग्रामीण भागातून येऊन कोणतीही पार्श्वभूमी नसताना प्रचंड मेहनतीने आणि संघर्षातून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. बार्शी शहरात कार्यरत असताना लोकमत दैनिकाच्या माध्यमातून दांडगा जनसंपर्क तयार झाला. अनेक जिवाभावाच्या मित्रांची साथ त्यांना मिळाली. याशिवाय, भगवंत मल्टिस्टेट बँक, मातृभूमी प्रतिष्ठान परिवार आणि लोकमतमधील ज्येष्ठ मंडळींचे मार्गदर्शनही सतत लाभले.
TATA सोबत यशस्वी प्रवास
फुरडे-पाटील यांनी जानेवारी 2024 पासून टाटा लाइफ इन्शुरन्ससोबत कार्य सुरू केले आणि अवघ्या तीन महिन्यांत MDRT चा बहुमान मिळवला. विशेष म्हणजे, एका वर्षात ते 4 वेळा MDRT म्हणजेच COT झाले. यावर्षीही त्यांनी फक्त तीन महिन्यांत MDRT+ हा बहुमान सलग दुसऱ्यांदा मिळवला आहे. धनसंपदा वेल्थ मॅनेजमेंटच्या माध्यमातून टाटा लाइफ ने त्यांना लीडरशिप ही दिली असून, ते नवीन एजंट नियुक्ती करण्याचे कार्यही करत आहेत. त्याचबरोबर, NJ Wealth च्या माध्यमातून म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे (SIP आणि Lumpsum) कार्य ते पार पाडत आहेत.
महाराष्ट्रभरातून मिळालेले सन्मान आणि शुभेच्छा
मागील आठवड्यात दनांग (व्हिएतनाम) शहरात, फुरडे-पाटील यांचा1 Tata लाईफचे राष्ट्रीय हेड मा. राकेश शर्मा आणि अमित दवे साहेब यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. शिवाय हैदराबाद येथे झालेल्या कंपनीच्या स्ट्रॅटेजी मिट मध्ये देखील त्यांचा विशेष गौरव करण्यात आला आहे.
यांच्या यंदाच्या MDRT डिक्लेरेशननंतर सोलापूर ब्रँच हेड यतीराज माने, सहा. शाखाधिकारी ज्ञानेश्वर पाटील, लीडर गोपी चिलेवरी यांनी सर रतन टाटा यांची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सत्कार केला. याशिवाय टाटा लाइफचे महाराष्ट्र प्रमुख दीपक फडणीस सर,पुणे क्लस्टर हेड रमेश पांचाळ, झोनल हेड प्रवीण पाटील, सोलापूर ब्रँच हेड,श्याम आरगडे साहेब ,ट्रेनर अश्विनी राजमाने मॅडम, पायल कामतकर मॅडम, शिवाजी कोल्हे आणि टाटा परिवारातील सहकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
शहाजी फुरडे-पाटील यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस अनंत शुभेच्छा!