मुंबई : अभिनेता शाहरुख खानला त्याच्या आगामी प्रोजेक्टसाठी शूटिंग करत असताना दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. लॉस एंजिलिसमध्ये त्याचं शूटिंग सुरू होतं. सेटवरील अपघातानंतर अमेरिकेतच शाहरुखवर सर्जरी करण्यात आली. या सर्जरीनंतर शाहरुखच्या नाकावर बँडेज पहायला मिळालं. सध्या तो भारतात परतला असून घरीच विश्रांती घेत असल्याचं कळतंय.
मात्र या अपघाताबद्दल अद्याप शाहरुख किंवा त्याच्या टीमकडून कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आली नाही. ‘शाहरुख खान लॉस एंजिलिसमध्ये एका प्रोजेक्टसाठी शूटिंग करत होता. त्यावेळी त्याच्या नाकाला दुखापत झाली आणि रक्त वाहू लागलं. ‘रक्तस्राव थांबवण्यासाठी छोटी सर्जरी करावी लागेल आणि काळजी करण्याचं कोणतंच कारण नाही, अशी माहिती डॉक्टरांकडून शाहरुखच्या टीमला देण्यात आली होती. सर्जरीनंतर शाहरुखच्या नाकावर पट्टी पहायला मिळाली. तो सध्या भारतात परतला असून घरीच आराम करत आहे’, असंही म्हटलं गेलं आहे.