सोलापूर – जिल्ह्यातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी अशा ६७ जणांना कालबध्द पदोन्नतीचे आदेश देणेत आले असल्याची माहिती सिईओ दिलीप स्वामी यांनी दिली. जिल्हा परिषदे मध्ये आज ग्रामसेवक यांना सिईओ दिलीप स्वामी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांचे हस्ते कालबध्द पदोन्नती चे आदेश वितरीत करणेत आले. या बद्दल ग्रामसेवक यांचे वतीने सिईओ दिलीप स्वामी यांना पुस्तक भेट घेऊन ग्रामसेवक यांनी आदर व्यक्त केला.
या प्रसंगी ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष शरद भुजबळ. कार्याध्यक्ष नारायण ढवळे, माढा चे अध्यक्ष औदुंबर शिंदे, मोहोळ ते एम आर माने, बार्शी विजयसिंह माने देशमुख, गोपाळ सुरवसे, माळशिरस ये एस एस माळी, किरण वाघमारे, वाकडे. मदने उपस्थित होते. ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांना 10 वर्षे, २० वर्षे व ३० वर्षे सेवा बजावलेल्या ग्रामसेवक यांना कालबध्द पदोन्नती देणेत सोलापूर जिल्हा परिषदेचा ग्रामपंचायत विभाग राज्यात आघाडीवर आहे. असेही उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी सांगितले.
जलजीवन मिशन च्या कामावर लक्ष द्या – सिईओ दिलीप स्वामी
जलजीवन मिशन ची कामे पुर्ण करणे साठी लक्ष द्या. ग्रामसेवक यांचा एकही प्रश्न प्रलंबित राहणार नाही मात्र सर्वसामान्यांची कामे प्रलंबित राहणार नाहीत याची काळजी घ्या. सक्षमीकरण अभियान प्रभावी पणे राबवा. कोरोना काळात तसेच महाआवास अभियानात चांगले काम केले आहे. नळकनेक्शन व जलजीवन मिशन साठी जागेचे प्रश्न सरपंचाना घेऊन सोडवा असे आवाहन केले.
ग्रामसेवक यांचे प्रश्न सोडविण्यात सोलापूर जिल्हा आघाडीवर – भुजबळ
सिईओ दिलीप स्वामी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी ग्रामसेवक यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावले आहे. सोलापूर जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. असेही ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष शरद भुजबळ यांनी सांगितले.यामुळे ग्रामसेवकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. प्रशासनाने ग्रामसेवक यांचे प्रश्न मार्गी लावले बद्दल आभार व्यक्त केले.