सोलापूर राष्ट्रनेता, लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त (दि. १७ सप्टेंबर) ते राष्ट्रपिता महात्मा गांधी पौच्या जयंतीपर्यंत (दि. २ ऑक्टोबर) देशभरात सेवा पंधरवडा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार सोलापूर शहर जिल्ह्यातील या अभियानाचे जिल्हा संयोजकपदी डॉ. शिवराज सरतापे सहसंयोजक पदी अनिल कंदलगी, दत्तात्रय पाटील, राम वाकसे, सोशल मिडिया प्रतिनिधी पदी योगेश गिराम सहप्रतिनिधी संदीप कुलकर्णी यांची निवड करण्यात आली.
“सेवा परमो धर्मः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांना पुढे नेत या अभियानांतर्गत विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यात स्वच्छता अभियान, वृक्षारोपण (एक पेड माँ के नाम), रक्तदान शिबिर, युवा मोर्चाच्या नेतृत्वात मोदी विकास मॅरेथॉन, दिव्यांग सन्मान, विकसित भारत चित्रकला स्पर्धा, पंतप्रधान नरेंद्रजी मोर्दीच्या जीवनावर आधारित पुस्तकांचे वितरण व डॉक्युमेंटरी फिल्म प्रदर्शन, प्रबुद्ध संमेलन, पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती निमित्त बूथ स्तरावर अभिवादन तसेच बूथ कार्यकत्यांच्या समवेत त्यांच्या घरी भोजन (२५ सप्टेंबर), तसेच २ ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पांजली, खादी वस्तूंची खरेदी करणे व नागरिकांना घेण्यास प्रेरित करणे यांचा समावेश आहे.
सदर सेवा पंधरवडा शहरामध्ये राबविण्यासाठी भाजपा पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांची कार्यशाळा दि.११ सप्टेंबर २०२५, रोजी सायंकाळी ५ वाजता सारस्वत मंगल कार्यालय डफरीन चौक येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार आहे व आ. विजय देशमुख, आ. सुभाष देशमुख, आ. देवेंद्र कोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व मंडलांमध्ये या कालावधीत सेवा उपक्रम राबवले जाणार आहेत.
या सेवा पंधरवड्यातील विविध उपक्रमांतून माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारत, विश्वगुरू भारत या संकल्पनेला बळ मिळेल. तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वदेशी मूल्यांवर आधारित सेवा कार्यक्रम होणार आहेत.
या दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा दि. २० सप्टेंबर रोजीचा जन्मदिवस देखील विविध सेवा उपक्रमांच्या माध्यमातून साजरा केला जाणार आहे.