सोलापूर : लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कुलस्वामिनी रुपाभवानी मंदिरांसह शहरातील देवी मंदिर परिसरात परिसरात भाविकांच्या दर्शनासाठी पालिका प्रशासनाने लसीकरण केंद्र उभे करावेत अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी केले.
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त शहरातील सर्वच शक्ती पिठांच्या मंदिरांमध्ये भक्तांची मांदियाळी असते परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारी मुळे भाविकांसाठी कुठल्याच मंदिरे दर्शनासाठी खुले नाहीत परंतु यंदाच्या वर्षी आघाडी सरकारने 7 ऑक्टोंबर पासून सर्वच धार्मिक स्थळे खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध मंदिरांमध्ये शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त जय्यत तयारी सुरू आहे लाखो भक्तांचे आराध्य दैवत असणार्या सोलापूर शहरातील रुपाभवानी मंदिर येथे नवरात्र महोत्सवाची लगबग सुरू आहे नवरात्र महोत्सव काळात मंदिर परिसरातील साफसफाई स्वच्छता रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजवावे तसेच रुपाभवानी मंदिर परिसरात भाविकांना दर्शनासाठी दोन कोरोना लसीकरण डोस घेणे बंधनकारक आहे तरच मंदिरात प्रवेश मिळणार आहे.
या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात पालिका प्रशासनाच्या वतीने दुसऱ्या डोससाठी लसीकरण केंद्र उभी करावीत तसेच शहरातील विविध देवी मंदिरात परिसरात ही लसीकरण केंद्र उभी करावीत अशी मागणी भाजपाचे जेष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी केले आहे…. स्टॉप.. दरम्यान सोमवारी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक सुरेश पाटील आणि नगर अभियंता संदीप कारंजे यांनी रुपाभवानी मंदिर परिसराचे महापालिकेच्या झोन कर्मचाऱ्यांना समवेत पाहणी करून रस्त्यांवरील खड्डे बुजविणे समाज मंदिराची स्वच्छता नाल्यांची साफसफाई व मंदिराचे पावित्र्य राखण्याच्या सूचना यावेळी त्यांनी केल्या. घटस्थापनेच्या आत मंदिरातील व मंदिर परिसरातील स्वच्छता चे कामे हाती घ्या. यावेळी रुपाभवानी मंदिराचे अध्यक्ष मल्लिनाथ लातुरे उपाध्यक्ष संताजी भोळे सचिव जगदेव बंडगर आदींची प्रमुख उपस्थिती होती.