सोलापूर : शहरातील कोळी समाजातील प्रसिद्ध फोटोग्राफर तसेच ज्येष्ठ समाजसेवक सिद्राम सिद्धपा तेलंगावकर यांचे शनिवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाले.. ते 73 वर्षाचे होते. त्यांनी कोळी समाजातील असंख्य मुला-मुलींची विवाह जुळून दिले होते. त्यांनी सोलापूर, विजापूर, हैदराबाद, इत्यादी भागात अनेक समाजसेवीची कामे केली आहेत. त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी,सुना नातवंडे असा परिवार आहे.