येस न्युज मराठी नेटवर्क ; फक्त २० रुपयांच्या इडलीवरून विक्रेत्याला जीव गमवावा लागला आहे. मुंबईपासून जवळच असलेल्या मीरा रोड येथे ही धक्कादायक घटना घडली. इडलीच्या किंमतीवरून ग्राहकांशी वाद झाला होता. घटनेनंतर पसार झालेल्या आरोपींचा शोध सुरू आहे.इडलीच्या किंमतीवरून विक्रेत्याचा दोन ग्राहकांशी वाद झाला. सुरुवातीला त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर धक्काबुक्की झाली. त्यांनी विक्रेत्याला धक्का देऊन जमिनीवर पाडले. यात जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, वीरेंद्र अमृतलाल यादव असे इडली विक्रेत्याचे नाव आहे.