महास्वामीजी यांचा पीठारोहण सोहळा बनहट्टी येथे संपन्न
आद्य जगद्गुरु देवदासमय्या हटगार समाज जगद्गुरुपदी श्री अक्कलकोट शरण मठाचे चिक्करेवणसिध्द शिवशरण महास्वामीजी यांचा पठारोहण सोहळा कर्नाटक राज्यातील बनहट्टी येथील एस आर ए मैदान येथे संपन्न झाला. या पिठारोहण सोहळ्यास बिदरचे शिवकुमार महास्वामीजी महालिंगपूरचे सहजानंद स्वामीजी, निरालाकेरीचे धनलिंग स्वामी, मैंदर्गीचे अभिनव रेवनसिद्ध पट्टदेवरु, श्री मृत्युंजय महास्वामीजी, मुदनुरचे ईश्वरानंद स्वामीजी, हिरेमठचे शरण बसवा शिवाचार्य, गुळेदगुडचे बसवराज पट्टाचार्य, यांच्या दिव्य सानिध्यात कर्नाटक राज्याचे वस्त्रोद्योग व साखर मंत्री शंकरा पाटील, आमदार सिद्धू सौदी, माजी मंत्री तथा अभिनेत्री उमाश्री, संगमेश उपने, महाराष्ट्र राज्य हटगार कोष्टी समाज अध्यक्ष नंदकुमार वसवाडे, सोलापूर नीलम नगर शरणमठाचे अध्यक्ष सिद्धाराम खजुरगी, माजी नगरसेवक गुरुशांत दुत्तरगावकर, सोलापूर जिल्हा अध्यक्ष सिद्धाराम हिट्टनळ्ळी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान एक ते तीन फेब्रुवारी दरम्यान बनहट्टी येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या पिठारोहण सोहळ्यास आंध्र कर्नाटका तेलंगणा महाराष्ट्र सह संपूर्ण देशभरातील तसेच विदेशातील हटगार कोष्टी समाज बांधवांनी उपस्थिती लावली होती. हटगार समाजाच्या हितासाठी सर्वांनी काम करावे सदाचार आणि सदगुणांचा पाया असलेल्या प्रत्येक मानवाच्या नेतृत्वात सुंदर जीवन घडेल समाजाच्या उन्नतीसाठी यापुढील काळात सर्वांनी एकजूट दाखवावी असे मत माजी मंत्री तथा अभिनेत्री उमाश्री यांनी यावेळी व्यक्त केलं. गेल्या अनेक वर्षापासूनच स्वप्न होतं हटकर समाजाचे एक पीठ असावं ते स्वप्न आज पूर्ण झाले आहे सहकार क्षेत्रासह रोजगारांमध्ये विणकर आणि हटगार समाजाला या पुढील काळात पाठाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येईल. यासाठी समाजाने आपली एकजुटी दाखवावी मानवाच्या नेतृत्वात सुंदर जीवन घडविण्यासाठी जात सोडा आणि धर्मासोबत चला धर्म सोडून धर्माच्या मार्गावर चालल्याने जिवन सार्थक होईल असे आशीर्वचन यावेळी नूतन जगद्गुरु श्री चिक्करेवणसिद्ध शिवरण महास्वामीजी यांनी केले. दरम्यान या पिठारोहण सोहळ्यास सोलापूर शहर जिल्ह्यातून हजारो समाज बांधव उपस्थित राहून हा सोहळा आपल्या नयनांनी पाहिला अशी प्रतिक्रिया नीलम नगर सोलापूर शरण मठाचे अध्यक्ष सिद्धाराम खजुरगी यांनी यावेळी दिली.