येस न्युज मराठी नेटवर्क : उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी गावच्या राष्ट्रवादी काँग्रेस च्या सुवर्णा झाडे-खेलबुडे यांची सार्वजनिक वितरण व्यवस्था तसेच दक्षता समितीच्या उत्तर सोलापूर सदस्यपदी निवड करण्यात आली . जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या स्वाक्षरीने अध्यक्ष व समितीचे सदस्य यांची नियुक्ती करण्यात आली.या समितीवर विशेष बाब म्हणजे मार्डी गावातील दोन पुरुष व एक महिला असे एकून तिघांना संधी देण्यात आली.यावरून असे लक्षात येते की या समितीवर मार्डी गावचे वर्चस्व दिसत आहे. या समितीवर मार्डी गावचे विध्यमान सरपंच अविनाश मार्तंडे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर सामाजिक कार्यकर्ते सुधीर खरटमल यांची सदस्यपदी वर्णी लागली.