सोलापूर । माढा तालुक्यातील आलेगाव बुद्रुक येथील ज्योतीराम राजगुरू यांची प्रहार शेतकरी संघटनेच्या कोंडाभाग ( टेंभुर्णी ) विभाग प्रमुख पदी निवड करण्यात आली.सोलापूर जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मस्के-पाटील यांनी नियुक्तीपत्र देऊन ही निवड केली.ज्योतीराम राजगुरू यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान पाहून त्यांना जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय मस्के-पाटील यांनी ही जबाबदारी दिली. प्रहार ही शिक्षण राज्यमंत्री व शेतकरी संघटनेचे नेते बच्चुभाऊ कडू यांची संघटना असून शेतकऱ्यांच्या न्याय, हक्कासाठी झटणारी संघटना काम करते.
यावेळी पहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय मस्के-पाटील, करमाळा तालुका जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष संदीप तळेकर, युवराज इंटरप्राईजेसचे एम.डी प्रवीण सूर्यवंशी,मराठा सेवा संघाचे जिल्हा संघटक प्रदीप पाटील,जोतीराम राजगुरू,राजू पाटील वेणेगाव,विकी राजगुरू आदी उपस्थित होते.