सोलापूर – भारताच्या रोटरी द्वारे येथील डॉक्टर राजीव प्रधान यांची रोटरी कोविड टास्क फोर्स वर निवड करण्यात आली असल्याचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. रोटरी झिल्ला ३१३१, ३१३२ व ३१७० साठी ते झोनल कॉ ऑर्डीनटोर म्हणून कार्य पाहतील. या रोटरी जिल्हांमध्ये पुणे , पनवेल, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, जालना, नांदेड औरंगाबाद, हुबळी , धारवाड ,गोवा आदी शहरांचा समावेश असणार आहे. रोटरी व भारत सरकार मध्ये नुकतेच कॉवीड रोगासाठी एक सामंजस्य करार झाला असून त्या अंतर्गत भारत सरकार ला कोविड विरोधी लसीकरण करण्यात सर्वोतपरी मदत करण्यात येणार आहे. या आधी रोटरी ने पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी भारत सरकार सोबत अत्यंत प्रभावी मोहीम राबविली आहे आणि त्यामुळेच रोटरी संस्थेची या करीता निवड झाली असल्याचे रोटरी इंडिया टास्क फोर्सचे अध्यक्ष अशोक महाजन यांनी यांनी सांगितले आहे .