सोलापूर: कै सुशीला गायकवाड बहुउद्देश संस्था केगाव सोलापूर संचलित भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय च्या प्राचार्य पदी डॉ. अनिल देशमाने यांची संस्थेने निवड केली आहे. यावेळी मावळते प्रभारी प्राचार्य डॉ. सय्यद जिलानी पाशा यांच्याकडून पदभार स्वीकारला या कार्यक्रम प्रसंगी .डॉ. सचिन देठे यांनी नवीन प्राचार्य यांच्या परिचय करून दिले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र डी गायकवाड सचिवा अनामिका रवींद्र गायकवाड यांनी नवीन प्राचार्य यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. अनिल देशमाने यांच्या प्राचार्य म्हणून पंधरा वर्षाच्या अनुभवी असून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल विद्यापीठ मान्यता प्राप्त प्राचार्य म्हणून दहा वर्षे कार्यकाळ सांभाळले तसेच इंजिनिअरिंग साठी सात पुस्तके लिहिली आहे. आणि त्यांनी राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर पेपर पब्लिश केले असून त्यांनी आय. इ.टी.इ. आणि आय. ई असोसिएशनची सदस्य आहे तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी चे दोन विद्यार्थी पदवी प्राप्त केले आहे या कार्यक्रमास सर्व एचओडी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते