बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या सौंदर्याचे लाखो- कोट्यवधी चाहते आहेत. सध्या ही अभिनेत्री भलेही रूपेरी पडद्यापासून दूर असेल पण तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. ऐश्वर्या एखाद्या कार्यक्रमात नटून-थटून पोहोचते, त्यावेळेस सर्वांचीच नजर तिच्या सौंदर्यासह लुकवरही खिळून राहते. तिचे ड्रेसिंग स्टाइलच इतके कमाल असते की लोक तिच्याकडे एकटक पाहतच राहतात.ऐश्वर्या राय बच्चन प्रत्येक प्रकारच्या पेहरावामध्ये सुंदरच दिसते. पण एखादी पार्टी किंवा कार्यक्रमामध्ये हजेरी लावायची असेल तर ती नेहमीच फॅशनेबल लुक कॅरी करते.तिचा ग्लॅमरस लुक पाहून अभिषेक बच्चनही झाला फिदा.
वेस्टर्न आउटफिट्सपासून ते पारंपरिक पेहराव, प्रत्येक पॅटर्नच्या स्टाइलमध्ये ऐश्वर्या खूपच सुंदर दिसते. ग्लॅमरस लुक कसा कॅरी करायचा, हे देखील तिला चांगलच ठाऊक आहे. म्हणूनच फॅशन आणि स्टाइलच्या बाबतीत ऐश्वर्या नेहमीच बाजी मारते. याचीच झलक तिची लाडकी लेक आराध्या बच्चनच्या वाढदिवशीही पाहायला मिळाली होती. कारण लेकीच्या वाढदिवशी ऐश्वर्यानं शॉर्ट ड्रेस घातला होता.
आराध्या बच्चनच्या सहाव्या वाढदिवसानिमित्तानं संपूर्ण बच्चन कुटुंब एकत्रित दिसले. यादरम्यान ऐश्वर्यानंही हटके लुक कॅरी केला होता. तिनं काळ्या रंगाचा मिनी ड्रेस परिधान केला होता, तर अभिषेक बच्चननं पांढरा आणि काळ्या रंगाच्या हुडीसह निळ्या रंगाची जीन्स परिधान केल्याचं आपण या फोटोमध्ये पाहू शकता. आराध्यानं फिकट गुलाबी रंगाचा फ्रॉक घातला, ज्यामध्ये ती क्युट दिसत होती. पण ऐश्वर्याचा लुक खूपच आकर्षक दिसत होता. तिन आपल्या साध्या स्टाइलनंही लोकांचे लक्ष वेधून घेतले .
ऑफ-शोल्डर शॉर्ट ड्रेसमध्ये
ऐश्वर्याने आराध्याच्या बर्थ-डे पार्टीसाठी शॉर्ट ड्रेसची निवड केली होती. तिनं परिधान केलेल्या आउटफिटमध्ये ऑफ-शोल्डर नेकलाइन आणि फुल स्लीव्ह्ज डिझाइन आपण पाहू शकता. ड्रेसच्या हेमलाइनवर पांढऱ्या रंगाचं लेस वर्क असणारी रुंद पट्टी जोडण्यात आली होती, ज्यामुळे ड्रेसला स्टायलिश लुक मिळाला आहे. ऐश्वर्यानं परिधान केलेला हा ड्रेस सैल पॅटर्नमधील होता, ज्यामुळे तिचा लुक कम्फर्टेबल देखील दिसतोय.
कम्फर्टेबल आणि स्टायलिश शॉर्ट ड्रेस परिधान करून ऐश्वर्यान आपली टोंड फिगर फ्लाँट केली. परफेक्ट लुक मिळावा यासाठी तिने ड्रेसवर म्यूल हील्स फुटवेअर मॅच केले होते. निळ्या रंगाच्या स्लिंग बॅगमुळे तिचा लुक अधिकच स्टायलिश दिसत होता. विशेष म्हणजे या ड्रेसवर एकही दागिना न घातल्याचही पाहायला मिळाले . मेकअपसाठी तिने डेवी फाउंडेशन, गडद लाल रंगाचे लिपस्टिक, स्लीक आय-लाइनर अशा ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर केला होता. तर सेंटर पार्टेड स्ट्रेट हेअरस्टाइलमुळे तिला शानदार लुक मिळाला.